जळगावच्या रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; शिवसेना उबाठा आक्रमक!

शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अलीकडेच एका चार वर्षांच्या बालकाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेने आज मनपा आयुक्तांच्या दालनावर धडक दिली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास शहरभरातील कुत्रे गोळा करून थेट आयुक्तांच्या दालनात सोडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना घेराव घालून सडेतोड जाब विचारण्यात आला. मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, आठ दिवसांत कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
पोलीस दलात मोठा फेरबदल! कोण कोठे गेले, पाहा संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, अल्पसंख्याक आघाडी महानगरप्रमुख जाकीर पठाण, उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, बाळा कंखरे, महिला आघाडी प्रमुख गायत्री सोनवणे, मनिषा पाटील, नीता सांगोळे, जया तिवारी, तसेच कुसुंबा उपसरपंच प्रमोद घुगे, विभागप्रमुख किरण भावसार, शोएब खाटीक, कलीम खान, शकील रंगरेज, शरद पाटील, विजय राठोड, लखन सांगिले, भैय्या वाघ, सौरभ चौधरी, आबीद खान, गोरख केदार, बापू मेने, सतीश मोरे, राहुल पाटील, राहुल शिंदे, नितीन राजपूत, रोहन पराये आणि अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगावच्या रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; शिवसेना उबाठा आक्रमक!
शिवसेनेने प्रशासनास स्पष्ट शब्दांत इशारा दिला की,
> “शहरातील कुत्र्यांमुळे जर पुन्हा एखादा निष्पाप जीव गमावला गेला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनावर राहील.”
🟠 पुढील दिशा:
मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून अधिक आक्रमक आंदोलन छेडेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शहरातील जनतेने देखील प्रशासनाकडून त्वरीत कारवाईची मागणी केली आहे.