शैक्षणिक क्षेत्रात धर्मवाद? – उत्तर महाराष्ट्रात खळबळ
शाळेतून मुलांचे ब्रेनवॉश? – हिंदुत्ववादी संघटनांचा गंभीर आरोप

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एक शाळा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण असे की, शाळेतील काही शिक्षक व प्राध्यापक यांनी हिंदू समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची संमती न घेता स्थानिक मशिदीत नेले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात श्री स्वामी ब्रह्मानंद महाराज (एकमुखी दत्तमठ, भुसावळ) यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांना थेट निवेदन पाठवले आहे. निवेदनात त्यांनी या घटनेचा सामाजिक, शैक्षणिक व मानसिक परिणाम अधोरेखित करत तत्काळ चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे :
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीशिवाय मज्जिदीत नेणे हा संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा भंग आहे.
शाळा ही ज्ञान, संस्कार व शैक्षणिक विकासाची जागा असून धार्मिक प्रभाव टाकणे अयोग्य व निंदनीय आहे.
या प्रकारामुळे पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
दोषी शिक्षक व प्राध्यापकांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी.
राज्यातील सर्व शाळांमध्ये धार्मिक तटस्थता कायम ठेवण्यासाठी स्पष्ट निर्देश जारी करण्यात यावेत.
पालकांच्या लिखित परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना कोणत्याही धार्मिक स्थळी नेण्यास सक्त मनाई करण्यात यावी.
समाजाची भावना :
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी पसरली आहे. पालकवर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून “शाळा धर्मप्रचाराचे केंद्र नसून शिक्षणाचे मंदिर आहे” अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
पुढील दिशा :
आता सर्वांचे लक्ष शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू होऊन दोषींवर कारवाई झाली, तरच पालक व समाजातील असंतोष निवळेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
📌 निवेदन करणारे :
- श्री स्वामी ब्रह्मानंद महाराज,
- एकमुखी दत्तमठ, भुसावळ, जिल्हा जळगाव
- 📞 संपर्क : 89283 33138