तरुणांनाठी शॉर्ट फिल्म साठी ‘योफिमा’ युवा शिष्यवृत्ती चा शुभारंभ

आजचा जमाना रील्स आणि शॉर्ट फिल्म निर्मितीत युवा वर्गाचा मोठ योगदान आहे. ह्याच युवा वर्गाच्या टॅलेंट ला योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव – देवगिरी चित्र साधनेच्या सहकार्याने खान्देश व मराठवाडा भागातील तरुण चित्रकर्मींसाठी *योफिमा शिष्यवृत्ती* अर्थात ‘यंग फिल्म मेकर फेलोशिप’ चा शुभारंभ आज करण्यात आला, सुप्रसिद्ध अभिनेता,लेखक ,दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण या योफिमा (YOFIMA) योजनेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. मराठवाडा व खान्देश परिक्षेत्रात चित्रपट निर्मितीसाठी ची सर्जनशीलता असूनही अनेक तरुण चित्रकर्मींना आर्थिक मदती अभावी आपली सर्जनशीलता व कलाकृती जगासमोर मांडता येत नाही अशा लघुपट निर्माते किंवा युवा चित्रकर्मींना आपली कला जगासमोर मांडता यावी यासाठी अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव – देवगिरी चित्र साधनेच्या सहकार्याने खान्देश व मराठवाडा भागातील तरुण चित्रकर्मींसाठी *योफिमा शिष्यवृत्ती* अर्थात यंग फिल्म मेकर फेलोशिप प्रोग्राम योजना आयोजित करत आहे. या योजनेत खान्देश व मराठवाडा भागातील म्हणजेच जळगाव, धुळे,नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,हिंगोली, नांदेड, लातूर, इ.जिल्ह्यातील १८ ते २५ वयोगटातील प्रतिभावान युवा चित्रकर्मींना सहभागी होता येणार आहे. योजनेत नोंदणी झालेल्या युवा चित्रकर्मींपैकी निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट ६ कलाकृतींच्या निर्मिती साठी प्रत्येकी रु २५०००/- इतकी शिष्यवृत्ती रक्कम मिळणार आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या प्रत्येक युवा फिल्म मेकर्स ना लघुपट निर्मिती साठी आवश्यक मार्गदर्शन तसेच कथा निवड, लेखन , दिग्दर्शन, पोस्ट प्रोडक्शन इ.विषयांच्या कार्यशाळेत मोफत सहभागी होता येणार आहे. या सर्व कार्यशाळांमध्ये चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज लेखन, दिग्दर्शक, कलावंत मार्गदर्शन करणार आहेत.या योजनेत सहभागी होण्यासाठी दि.५ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता,लेखक ,दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण या योफिमा (YOFIMA) योजनेचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत.या योजनेचा शुभारंभ सोहळा दि. १४ऑगस्ट २०२४ रोजी जळगावातील माँटेल कोझी काँटेज येथे मान्यवरांच्या हस्ते योफिमा चे पोस्टर विमोचन करुन उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी कोझी काँटेज चे संचालक श्री. प्रकाशसेठ चौबे,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, अजिंठा फिल्म सोसायटीचे सहसचिव श्री. विनीत जोशी,सदस्य श्री. पियुषभाई रावळ, प्रसिद्धी प्रमुख श्री. संतोष सोनवणे,भारत विचार मंचचे श्री. संजय हांडे, देवगिरी चित्र साधना चे संयोजक श्री.किरण सोहळे,सहसंयोजक प्रा.सुचित्रा लोंढे,सदस्य श्री.प्रवीण सोनवणे इ.मान्यवर उपस्थित होते. अजिंठा फिल्म सोसायटीच्या वतीने श्री. विनीत जोशी यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा लोंढे यांनी केले तर किरण सोहळे यांनी मान्यवरांचे आभार मानले. या योजनेचा अधिकाधिक युवा चित्रकर्मींनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी 9892906374 -7057344411 – 9422277384 – yofima2024@gmail.com वर संपर्क साधावा असे आवाहन योफिमा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.योगेश सोमण ,सदस्य डॉ.जयंत शेवतेकर,श्री.किरण सोहळे,श्री.विनीत जोशी,प्रा.सुचित्रा लोंढे,डॉ.जयेंद्र लेकुरवाळे , डॉ.अनुराधा पत्की, श्री.संजय हांडे यांनी केले आहे.