बातम्या

गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेची अटक

जळगाव (०३ एप्रिल २०२५): स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील अर्जुन जनार्दन कोळी (वय ३०) यास बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.

गुप्त माहितीवर कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अर्जुन कोळी हा गावठी कट्टा बाळगून परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. अधिक तपासाअंती, तो घोडसगाव ते मुक्ताईनगर रोडवरील प्रेम प्रतीक टी सेंटरजवळ असल्याची खात्री झाली.

संशयित ताब्यात

गुप्त बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रेम प्रतीक टी सेंटरजवळ संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने स्वतःचे नाव अर्जुन जनार्दन कोळी, वय ३०, राहणार घोडसगाव, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापास परमिट असलेला गावठी कट्टा मिळून आला. सदर शस्त्राची अंदाजे किंमत २०,०००/- रुपये असून, तो दहशत माजवण्याच्या उद्देशाने त्याचा वापर करणार असल्याचे स्पष्ट झाले.

 

गुन्हा दाखल

त्यानंतर अर्जुन कोळी याला ताब्यात घेऊन मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध CCTNS NO ९९/२०२५ प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे अधिकारी आणि मार्गदर्शन

सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्री. दत्तात्रय पोटे, पोलीस हवालदार प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी केली.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!