बातम्या
अजिंठा चौफुली परिसरात अचानक बंद पडलेला एक कंटेनर वाहतूक ठप्प

जळगाव – अजिंठा चौफुली परिसरात अचानक बंद पडलेला एक कंटेनर वाहतूक ठप्प करणारा ठरला होता. मात्र नागरिकांचा तत्पर सहभाग आणि वाहतूक पोलिसांची चोख भूमिका यामुळे काही वेळातच रस्ता मोकळा करण्यात यश आले.
या उपक्रमात विसपुते व इंगळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी इतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने कंटेनर ढकलून रस्त्याच्या बाजूला घेतला, त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.
यावेळी जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी वाहतुकीचा योग्य प्रकारे नियमन करत नागरिकांना सहकार्य केले. नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.