बातम्या
खानदेशातील सर्वात आकर्षक सुगोकी रिसॉर्ट

पाळधी, तालुका धरणगाव, जि. जळगाव – खानदेशातील सर्वांत आकर्षक डेस्टिनेशन वेडिंग ठिकाण म्हणून उभ्या राहिलेल्या सुगोकी रिसॉर्टने आपल्या भव्य आणि अत्याधुनिक सुविधांसह आता आपल्या सेवेत रुजू होण्याची घोषणा केली आहे. जळगावपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर वसलेला, पाळधी गावातील सुगोकी रिसॉर्ट निसर्गाच्या सानिध्यात आणि शहराच्या गोंगाटापासून दूर असलेला एक अद्वितीय ठिकाण आहे. हे एक परिपूर्ण स्थळ आहे, जिथे तुमचा विवाह सोहळा, सण-उत्सव, किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवता येईल.
सुगोकी रिसॉर्टचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या भव्य रिसॉर्टला आणखी एक प्रतिष्ठा प्राप्त झाली.