रावेर येथे धनगर समाज्याचे रस्ता रोको आंदोलन. आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचा पत्राद्वारे धनगर समाज्याच्या आरक्षणास पाठिंबा

पंढरपूर येथे धनगर समाज आरक्षणाच्या मागण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण करत असल्याने त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज रावेर येथे रावेर तालुका धनगर समाज यांच्या वतीने शेळ्या मेंढ्यांसकट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून याप्रसंगी मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आपले पत्र त्यांचे निकटवर्ती असलेले तुषार कचरे यांच्याकडे देत धनगर समाजाच्या मागणीस माझा पूर्ण पाठिंबा असून तात्काळ महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) प्रमाणपत्र देण्यात यावे. सदर पत्राच्या आधारे माझा जाहीरपणे पाठींबा देत असून आपण ताबडतोब शासन निर्णय काढून धनगर जमातीला अनेक वर्षापासुन होणार्या अन्यायातून मुक्त करावे. असे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दिलेल्या पत्रात म्हटले असून धनगर समाज्याच्या मागणीस पाठींबा दिला आहे.याप्रसंगी रावेर येथे रस्तारोको आंदोलन वेळी समाज्याचे जेष्ठ नेते सुरेश धनके, ऍड. प्रवीण पाचपोहे, युवा नेतृत्व संदीप सावळे यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन लखन सावळे यांनी केले. यावेळी डॉ. भगवान कुयटे, राजन लासुरकर, तुषार कचरे, अक्षय धनगर, किरण कचरे, निलेश कचरे, सौरव धनके, हिलाल सोनवणे, शुभम नमायते, दिलीप सोनवणे, अभिनाथ बोरसे, जयेश कुयटे, यांच्यासह असंख्य अश्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीत नायब तहसिलदार रावेर यांना धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन दिले.