वरखेडे खुर्द येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जल्लोषात प्रवेश

चाळीसगाव – तालुक्याचा आमदार झाल्यानंतर छोट्या छोट्या गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायत करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आज वरखेडे खुर्द येथील भाजपच्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून महाविकास आघाडीचे सरकार येणार असून आपली ग्रामपंचायत स्वतंत्र ग्रामपंचायत करू अशी ग्वाही माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले.आज वरखेडे खुर्द येथील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी ते बोलत होते. खासदार जनसेवक कार्यालयात सायंकाळी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.*विकासाचे वाटेकरी व्हा* यावेळी लोकसभा समन्वयक महेंद्रबापू पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले ते म्हणाले की उन्मेशदादा हे तरुण युवकांचे आयडॉल असून त्यांच्या शिवसेना प्रवेशाने नवीन झंझावात तालुक्यात निर्माण झाला आहे. उन्मेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रोज प्रत्येक गावातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने आपला माणूस नक्की आमदार होणार असून आपण विकासाचे वाटेकरी होणार असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुळ तिरमली यांच्यासह विलास तिरमली, जयपाल निरमली,गोरख तीरमली, संदीप तिरमली, प्रमोद तिरमली, राजेश तिरमली, विकास तिरमली,निर्मल तिरमली, उमेश तिरमली, ऋषिकेश तिरमली,संदीप तिरमली, दादाभाऊ तिरमली, बापू तिरमली, कृष्णा तिरमली, आदित्य तिरमली,गोकुळ नाना तिरमली यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आजच्या प्रवेश सोहळ्याला जळगाव लोकसभा समन्वयक मच्छिंद्रबापू पाटील, पंचायत समिती सदस्य कै.ची.बापू पाटील,मा.उपसभापती भाऊसाहेब पाटील,बेलगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, माजी संचालक चांगदेव राठोड, पंचायत समिती माजी सदस्य रवीभाऊ चौधरी, माजी सरपंच रविआबा राजपुत, बारा बलुतेदार सेना जिल्हाप्रमुख मुकेश गोसावी, अनुसूचित जाती जमाती सेनेचे सोनू अहिरे, सोशल मीडिया प्रमुख गणेश महाजन, जेष्ठ नेते पद्माकरदादा पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेनकाका जैन, युवा सेनेचे सचिन फुलवारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसभा समन्वयक महेंद्र बापू पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन मुकेश गोसावी यांनी केले. पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील यांनी आभार मानले. सर्वांचे भगवा रुमाल घालून शिवसेना पक्षात जल्लोषात स्वागत करण्यात आले.