बातम्या

जळगाव शहर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी : अवैध शस्त्र बाळगणारे अटटल गुन्हेगार जेरबंद

जळगाव शहरात धडक कारवाई – अवैध पिस्तुलांसह ४ अटटल गुन्हेगार जेरबंद!

जळगाव | जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत दि. 11/09/2025 रोजी सकाळी 04.15 वा. च्या सुमारास गेंदालाल मिल दुध फेडरेशनकडे जाणाऱ्या रोडवर, सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर चार आरोपी अवैध शस्त्रांसह संशयास्पदरीत्या फिरताना जळगाव शहर गुन्हे शोध पथकाने रंगेहात पकडले.

सदर आरोपींची नावे अशी आहेत –

  • युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय 33 वर्ष, रा. गेंदालाल मिल, जळगाव),
  • निजामोददीन शेख हुसेनोददीन शेख (वय 31 वर्ष, रा. आझाद नगर, जळगाव),
  • शोएब अब्दुल सईद शेख (वय 29 वर्ष, रा. गेंदालाल मिल, जळगाव),
  • सौहिल शेख उर्फ दया सी.आय.डी. युसुफ शेख (वय 29 वर्ष, रा. शाहू नगर, जळगाव).

हे सर्वजण गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे व मॅगझिनसह परवानगीशिवाय आपल्या कब्जात ठेवून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असताना मिळून आले.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोकाँ/131 प्रणय सुरेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. क्रमांक 339/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 मो.वा. अधिनियम कलम 3(1), 181, 3/181 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कशी झाली कारवाई?

गुन्हे शोध पथकातील अंमलदार सफौ/38 सुनील दामोदर पाटील, पोहेकाँ/2611 सतीष रमेश पाटील, पोकाँ/3245 अमोल ठाकुर व पोकाँ/131 प्रणय पवार हे जळगाव शहर हद्दीत रात्रगस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गेंदालाल मिल परिसरात सुरेशदादा जैन बंगल्यासमोर काही इसम कारमध्ये अवैध शस्त्रांसह फिरत आहेत.

ही माहिती मा. पो.नि. सागर शिंपी यांना कळविल्यानंतर त्यांनी संपूर्ण डी.बी. स्टाफला घटनास्थळी रवाना केले. तेथे पोहोचल्यावर एक कार संशयास्पदरीत्या उभी दिसल्याने ती थांबवून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस असल्याची कबुली दिली.

अंगझडती व वाहन तपासणीदरम्यान आरोपी युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल याच्याकडून एक पिस्तूल व त्यात 04 जिवंत राउंड, तसेच कारमध्ये 01 पिस्तूल, 06 जिवंत राउंड, 01 मॅगझिन व मारुती सुझुकी कार क्र. एम.एच.43 ए.आर.9678 असा मुद्देमाल एकूण 1,78,000/- रुपयांचा जप्त करण्यात आला.


आरोपींचा गुन्हेगारी इतिहास

आरोपी युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल याच्यावर आधीपासून खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत –

  1. जळगाव शहर पोलीस स्टेशन – गुन्हा रजि. नं. 150/2023, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25.

  2. जळगाव शहर पोलीस स्टेशन – गुन्हा रजि. नं. 318/2023, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25.

  3. जळगाव शहर पोलीस स्टेशन – गुन्हा रजि. नं. 203/2025, भा.न्या.सं. कलम 125, 125ब सह भा. शस्त्र अधिनियम 3/25, 5/25, 27.

  4. भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन – गुन्हा रजि. नं. 331/2017, भा.दं.वि. कलम 34.

  5. जळगाव तालुका पोलीस स्टेशन – गुन्हा रजि. नं. 110/2055, भा.दं.वि. कलम 302, 120ब, 143, 147.


वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची भूमिका

ही धडाकेबाज कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे, तसेच पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या सूचनांनुसार करण्यात आली.

या कारवाईत गुन्हे शोध पथकातील सफौ. सुनील पाटील, पोहेकाँ उमेश भांडारकर, पोहेकाँ सतीष पाटील, पोहेकाँ नंदलाल पाटील, गाहकाँ योगेश पाटील, पोहेकाँ विरेंद्र शिंदे, पोहेकाँ दिपक शिरसाठ, पोहेकाँ भगवान पाटील, पोकाँ प्रणय पवार, पोकाँ अमोल ठाकुर, पांकी भगवान मोरे व पोकाँ राहुलकुमार पांचाळ यांनी सहभाग घेतला.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.


👉 ही होती जळगाव शहर गुन्हे शोध पथकाची अवैध शस्त्रविरोधातील उल्लेखनीय कारवाई, ज्यामुळे शहरातील अटटल गुन्हेगारांच्या हालचालींना मोठा आळा बसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!