जळगाव प्रभाग १२ मध्ये स्वप्निल दादा परदेशींचा भक्तीमय उपक्रम – गणेशोत्सवात १०,००० आरती संग्रहाचे भव्य वाटप
१०,००० प्रतींनी भरलेला भक्तीचा माहोल! गणेश आरती संग्रहाचे वाटप सुरू

जळगाव, दि. २९ ऑगस्ट – जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना उपजिल्हाप्रमुख स्वप्निल दादा परदेशी यांच्या पुढाकारातून ‘श्री गणेश आरती संग्रह’ या पुस्तकाच्या तब्बल १०,००० प्रतींचे वाटप करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे औचित्य साधत नुकतेच या आरती संग्रहाचे विमोचन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश आप्पा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शिवराज भाऊ पाटील, तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत बोलताना उपजिल्हाप्रमुख स्वप्निल दादा परदेशी म्हणाले की, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. भाविक भक्तांना गणपती बाप्पाच्या आरत्या सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हा आरती संग्रह पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे.”
प्रभाग क्रमांक १२ मध्ये गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे.
गणपती बाप्पा मोरया!