नवरात्रच्या पहिल्याच दिवशी भव्य उद्घाटन, सोनं-हिरे-पोल्कीचा एकाच ठिकाणी जल्लोष!
हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्

जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या रिंगरोडवरील ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ आता अधिक भव्य स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत येत आहे. नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी या नव्या शोरूमचे भव्य उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी राजकारण आणि समाजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
गेल्या चार वर्षांपासून ‘हाऊस ऑफ ज्वेल्स’ म्हणून चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या बाफना परिवाराने ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि मागणीमुळे आता सोन्याचे दागिने आणि डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपले पूर्वीचे शोरूम (गंगाई बिल्डिंग, रिंग रोड) सोडून, त्याच्या समोरच पंचरत्न टॉवर, जेडीसीसी बँकेसमोर, रिंग रोड येथे स्वतःचे नवीन आणि प्रशस्त शोरूम सुरू केले आहे.
सोमवार, दि. २२ सप्टेंबर ते बुधवार, दि. २ ऑक्टोबर (विजयादशमी) या कालावधीत ‘विशेष उद्घाटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित मान्यवरांमध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खा. ईश्वरबाबूजी ललवाणी, उद्योजक अशोकभाऊ व ज्योती जैन, नयनताराजी बाफना, खा. स्मिताताई वाघ, पद्मश्री ॲड. खा. उज्ज्वल निकम, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, भागवतजी भंगाळे, भरतदादा अमळकर, गोसेवक अजय ललवाणी, ॲड. नारायण लाठी आदी मान्यवरांचा समावेश आहे.
या निमित्ताने बाफना परिवाराने सोन्या-चांदीसोबत हिरे, पोल्की, जडाऊ, प्लॅटिनम आणि राशीरत्नांचे आकर्षक दागिने एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी या विशेष महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन सुनील कस्तूरचंदजी बाफना, अभिषेक सुनीलजी बाफना आणि ऋषभ सुनीलजी बाफना यांनी केले आहे.
या उद्घाटन सोहळ्यामुळे जळगावकरांना दागिन्यांच्या खरेदीसाठी भव्य व खास संधी मिळणार असून, शहरातील रिंगरोड परिसरात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ हे नवे ठिकाण ग्राहकांचे आकर्षण ठरणार आहे.