बातम्या

मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.

त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, रणजीत जाधव, दिपक चौधरी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

वर नमुद पथकातील अमंलदार यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रविंद्र उर्फ राहुल पाटील व दिपक ज्ञानेश्वर पाटील हे सोबत मोटार सायकल चोरी करून वापरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने अमंलदार यांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेवून त्यांन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतल्या प्रमाणे त्याचे कडून १,०५,०००/- रु. किं.च्या ६ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत १) पारोळा पो.स्टे. १३/२०२४ भादवि कलम ३७९, २) भडगाव पो.स्टे.ला गुरनं ३४५/२०२४ भा.न्या.सं.३०३(२) प्रमाणे जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरीत ४ मोटार सायकल ह्या पुणे व मुंबई येथून चोरी केल्याचे सांगीतल्याने त्याबाबत शोध सुरु आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!