बातम्या

दारू पिऊन ट्रक चालवला! जळगावात ट्रकचालकावर पोलिसांची धडक कारवाई

दि. 28 जुलै 2025 रोजी, इच्छादेवी चौकी परिसरात वाहतूक शाखेने नशेत वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकावर कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस शिपाई वैशाली पाटील यांना एका ट्रक चालकाने संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळले. या वेळी एम.एच.15-इझेड-6253 क्रमांकाच्या ट्रकचा चालक विशाल वाघ (वय 25) यास थांबवण्यात आले.

पोलिस नाईक धनराज बडगुजर (733) व पोलीस अमलदार दीपक पाटील (98) यांनी ब्रेथ अनालायझर चाचणी केली असता, ट्रक चालकाने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल तात्काळ ताब्यात घेण्यात आले व ट्रकसह वाहतूक शाखा, जळगाव येथे आणण्यात आले.सदर ट्रकमध्ये “टॅंगो पंच” नावाची दारू भरलेली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संबंधित दारूचे सर्व कागदपत्रे कायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ट्रकमधील दारूसंदर्भात कोणतीही बेकायदेशीर बाब आढळून आली नाही.मात्र, चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवले असल्यामुळे मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक पवन दिसले यांच्या आदेशाने चालकाला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला असून समज देऊन त्यास सोडण्यात आले.

JALGAON TRAFFIC

🚨 महत्वाचे मुद्दे:

  • ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे नशा असल्याचे स्पष्ट

  • ट्रकमधील दारू कायदेशीर, कागदपत्रे योग्य

  • कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल

  • न्यायालयात दंड वसूल, समज देऊन चालक मुक्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!