सतखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे भव्य आयोजन
Pratap patil

धरणगाव तालुक्यातील सतखेडा (पिंप्री सोनवद जिल्हा परिषद गट) येथे दिनांक 18 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अंदाजे 20 लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या या इमारतीचे भूमिपूजन मा. प्रतापराव गुलाबराव पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांच्या शुभहस्ते पार पडले.
या सोहळ्याला डी. ओ. पाटील (शिवसेना तालुका प्रमुख), गजानन धनसिंग पाटील (सभापती शेती संघ एरंडोल-धरणगाव), जिल्हा परिषद सदस्य बापूसो गोपाल बापू चौधरी, संजय पाटील सर (विधानसभा क्षेत्र प्रमुख), गजानन नाना पाटील, रवींद्र चव्हाण सर, प्रेमराज भाऊ पाटील, अनिल भाऊ पाटील, दीपक भाऊ भदाणे (युवासेना तालुकाप्रमुख), पवन पाटील आहेरे (युवासेना संघटक), अजयसिंग पाटील (युवासेना उपतालुका प्रमुख), गणेश भाऊ वंजारी (लोकनियुक्त सरपंच), संदीप भाऊ भोद (लोकनियुक्त सरपंच) व विजुभाऊ भोद यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी पिंप्री सोनवद गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, तसेच महिला आघाडी, शेतकरी सेना, दिव्यांग सेना, अल्पसंख्याक सेना, मागासवर्गीय सेना, शिवसेना, युवासेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), ज्येष्ठ शिवसैनिक, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या ग्रामपंचायत इमारतीच्या उभारणीमुळे गावात प्रशासकीय कार्याला स्थळ उपलब्ध होणार असून ग्रामविकासाच्या दृष्टीने ही इमारत एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.