बातम्या

जळगावात ढोल-ताशाच्या गजरात शौर्यवीर पथकाचा भव्य वाद्यपूजन सोहळा!

जळगाव – पारंपरिक वाद्यसंस्कृतीचा वारसा जपणाऱ्या शौर्यवीर प्रतिष्ठान संचलित ढोल-ताशा पथकाच्या पाचव्या वाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक 01 जून 2025 रोजी नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात व पारंपरिक ढंगात करण्यात आले. या सोहळ्याने नव्या वादकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”

या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून जळगावचे आमदार मा. सुरेशजी भोळे, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे प्रकल्प व्यवस्थापक अनिलजी जोशी, नायब तहसीलदार रूपालीताई काळे, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, शिक्षणतज्ज्ञ दिलीपजी नाझरकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आपली प्रेरणादायी उपस्थिती दर्शवली.

 

पुण्याला निघालेली ट्रॅव्हल्स उलटली – भीषण अपघातात प्रवासी जखमी!

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वाद्यपूजनाने झाली. ढोल-ताशा वाद्यांना फुल, हार व फुलांचे अबीर टाकून विधीवत पूजा करण्यात आली. तदनंतर पथकातील वादकांनी आपली दमदार सांघिक सादरीकरणे सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

शौर्यवीर ढोल-ताशा पथकात सध्या एकूण १६० वादक कार्यरत आहेत, यामध्ये १०५ मुले व ५५ मुलींचा समावेश आहे. हे पथक मागील पाच वर्षांपासून जळगाव शहरातील विविध उत्सवांमध्ये आपल्या प्रभावी वादनातून संस्कृतीचे दर्शन घडवत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती अशा अनेक महत्त्वपूर्ण सण-उत्सवात पथकाने आपल्या कला-प्रदर्शनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

भरधाव वाहनाखाली तहसीलचा कर्मचारी

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शौर्यवीर पथकाच्या कार्याची प्रशंसा केली. मराठी अस्मिता, पारंपरिक वाद्यांचा प्रचार आणि युवांमध्ये सांस्कृतिक जागृती निर्माण करण्यासाठी अशा पथकांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शौर्यवीर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, वादक आणि त्यांच्या पालकांचे विशेष योगदान लाभले.

शौर्यवीर पथकात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या नवोदित वादकांनी चिन्मय नाझरकर (मो. 9028320472) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!