बातम्या

जळगाव शहरात अवैध गावठी पिस्टलची कारवाई करण्यात आली.

जळगाव शहरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे खात्री करून दिनांक २३/११/२०२४ रोजी २०.३५ वा जळगाव शहरातील उस्मानिया पार्क भागातील सवलत किराणा दुकाना जवळ रोडवर आरोपी नमीर खान आसीफ खान, वय १९, रा. काट्या फाईल जळगाव ह.मु.उस्मानीया पार्क जळगाव याचे ताब्यात एक गावठी बनावटीचा पिस्तोल मॅक्झीन सह अंदाजे ३०,०००/- रु.कि.चे व २००० रु किंमतीची एक खाली मॅग्झीन असे एकुण ३२००० रुपये किंमतीचा मुद्देमाल विनापास परमिटा शिवाय बेकायदेशीर पणे दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने कब्ज्यात बाळगतांना मिळुन आला म्हणुन त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशनला CCTNS NO ५१४/२०२४ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही पोलीस उप निरीक्षक श्री दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, राहुल पाटील सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली आहे.सदरची कारवाई ही मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. जळगाव यांचे मागर्दशनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!