Uncategorized

आरोपीतास हजर केले बाबत.

Jalgaon-police-breaking news

उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की, चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO २२०/२०२४ भादवि कलम ३९५,३२३,२९४,५०६ सह आर्म अॅक्ट ४/२५ मधिल फरार आरोपी सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर, वय २७, रा.इस्लामपुरा जामा मशिद जवळ दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे याचा तांत्रिक विश्लेषण करून त्याचा शोध घेत असतांना आम्हास गोपनीय माहिती मिळाली की, सुलतान बिल्डर हा चोपडा येथे येत असल्याची बातमी मिळाली त्यावरून आमचे सोबत असलेले पोह ३१८० विलेश विश्वासराव सोनवणे, पोना ४६२ हेमंत प्रतापराव पाटील, पोकॉ ११२५ प्रदिप सिताराम चवरे सर्व नेम. स्थागुशा जळगाव असे आम्ही खाजगी वाहनाने निघुन चोपडा शिरपुर रोडवरील गंलगी फाट्याजवळ आमचीओळख लपवून थांबलो होतो.त्यानंतर १६.३० वा.चे सुमारास १ मोटार सायकल वर दोन इसम येत असतांना दिसले त्यावेळीत्यातील मागे बसलेला सुलतान बिल्डर असल्याचे आम्ही ओळखले त्यावर त्यांना हात दाखवून थांबण्यास सांगीतले. त्याप्रमाणे तो थांबल्याने त्यास आमची ओळख देवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर, वय २७, रा.इस्लामपुरा जामा मशिद जवळ दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे असे सांगीतले. त्यावर पोह विलेश सोनवणे यांनी गलंगी येथील पंचनाम्यातील नमुद दोन पंचाना बोलावून सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर याचीअंगझडती घेवून त्याचे अंगझडतीत ५७००/- रु. रोख मिळून आल्याने ते पंचासमक्ष गुन्ह्याकामी जाप्त करून तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. येणे प्रमाणे ५७००/- रु. रोख व आरोपी सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर, वय २७, रा.इस्लामपुरा जामा मशिद जवळ दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे याची वैद्यकिय तपासणी करून चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO २२०/२०२४ भादवि कलम ३९५,३२३,२९४,५०६ सह आर्म अॅक्ट ४/२५ या गुन्ह्याचे पुढील तपासकामी आपणासमक्ष हजर केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!