बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी अर्जून पाटील यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । माझी लाडकी बहिण योजनेच्या जळगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी अर्जून गजमल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी अर्जून पाटील यांची निवड करण्यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पत्र दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अर्जून पाटील यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिवराज पाटील शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र पाटील शिवसेना समन्वयक मुकुंद ननवरे, रमेश पाटील, पालकमंत्री स्वीयसहाय्यक नवलसिंग राजे यांनी अभिनंदन केले आहे.