बातम्या

नितीन गडकरी आज जळगावात

जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) येथे आज शुक्रवार दिनांक १० मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी महायुतीची जिल्ह्यात पहिलीच सभा होत असल्याने नितीन गडकरी यांच्या सभेची उत्सुकता महायुतीच्या पदाधिकाऱ्यासह मतदारांमध्ये दिसून येत आहे. या सभेला स्मिताताई वाघ व रक्षाताई खडसे हे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!