बातम्या

अ‍ॅड. आनंद मुजुमदार यांची भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदावर नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) | जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. आनंद मुजुमदार यांची भारत सरकारच्या कायदा व न्याय मंत्रालयामार्फत अधिकृत नोटरी पदासाठी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती म्हणजे केवळ त्यांच्या दीर्घकालीन कार्याचा सन्मान नसून, जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अ‍ॅड. मुजुमदार हे सध्या जळगाव महापालिकेत चीफ लीगल ऑफिसर म्हणून कार्यरत असून, त्यांनी गेल्या दोन दशके न्याय व कायद्याच्या क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. विविध शासकीय, निमशासकीय व सामाजिक संस्थांमध्ये कायदेविषयक सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि समाजाभिमुख दृष्टीकोन यामुळेच त्यांची ही निवड निश्‍चित झाली असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.

नोटरी पदाचे महत्त्व काय?

नोटरी ही एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर जबाबदारीची भूमिका आहे. या अंतर्गत प्रतिज्ञापत्रे, करारनामे, घोषणापत्रे, अधिकृत पत्रव्यवहार व इतर कायदेशीर दस्तऐवजांचे प्रमाणिकरण करण्याचा अधिकार अधिकृतरित्या प्राप्त होतो. अशा पदावर अ‍ॅड. आनंद मुजुमदार यांची नेमणूक झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना कायदेशीर सेवा अधिक प्रभावी व विश्वासार्ह पद्धतीने मिळू शकणार आहे.

सहकाऱ्यांत व विधिज्ञ मंडळात आनंदाचे वातावरण

या यशस्वी निवडीमुळे अ‍ॅड. मुजुमदार यांच्या सहकाऱ्यांत, मित्रपरिवारात व जळगाव जिल्ह्यातील विधिज्ञ मंडळात आनंदाचे व गौरवाचे वातावरण आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

“ही नियुक्ती म्हणजे माझ्या कार्याचा सन्मान असून, ही संधी मला जळगाव जिल्ह्यातील जनतेसाठी नवे योगदान देण्याची संधी देणारी आहे,” अशी भावना अ‍ॅड. आनंद मुजुमदार यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!