युवासेनेच्या सदस्यांची नोंदणी अभियानात तरुणांचा मोठा सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) – युवासेना, शिवसेना (शिंदे गट) जळगाव शहराच्या वतीने आज दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून आय.एम.आर. कॉलेज चौक, जळगाव येथे भव्य सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शेकडो युवकांनी उपस्थित राहून युवासेनेत दाखल होण्याची तयारी दर्शविली.
या अभियानाचे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे नेतृत्व युवानेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष मा. पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे, जिल्हा परिषद सदस्य व युवानेते प्रतापराव पाटील यांच्या प्रेरणेतून, उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश पाटील, युवासेना कार्यकारिणी सदस्य निखिल चौधरी, व युवासेना विस्तारक किशोर भोसले यांच्या प्रभावी संयोजनात पार पडला.
कार्यक्रमात शहरातील अनेक युवक, विद्यार्थी, व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. नवोदित युवकांनी युवासेनेची सदस्यता स्वीकारत सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
युवासेना जळगाव शहर अध्यक्ष रोहित कोगटा यांनी सर्व सहभागी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यातही असेच युवकांशी संवाद साधणारे, त्यांना संघटित करणारे कार्यक्रम नियमितपणे राबविले जातील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
- शिवसेना महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विस्तारक सरिता ताई माळी
- युवासेना विस्तारक किशोर भाऊ भोसले
- शिवसेना महानगर प्रमुख संतोष भाऊ पाटील
- युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित भाऊ कोगटा
- शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र भाऊ गवळी
- युवासेना महानगर उपाध्यक्ष सनी सोनार
- युवासेना महानगर उपाध्यक्ष विशाल निकम
कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे कार्यकर्ते:
नयन चव्हाण, रोहन सपकाळे, शुभम कस्तुरे, प्रथमेश पाटील, जय कस्तुरे, कल्पेश बागूल, धीरज सोनार, सुशील मोरे, दीपक सोनवणे, पीयूष सोनार, यश पाटील, संदीप पाटील, रोहित गवळी, दिनेश पाटील आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.