यावल पोलीसांची धडक कारवाई – यावल-चोपडा महामार्गावर ४ किलो गांजा जप्त

यावल, दि. 26 ऑगस्ट 2025 यावल पोलीस स्टेशनच्या दक्ष कारवाईतून यावल-चोपडा हायवेवर ४ किलो गांजासह तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. NDPS कायद्यांतर्गत (गुन्हा क्रमांक 247/2025) दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणाने परिसरात खळबळ उडवली आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुप्त माहितीनुसार सापळा
दि. 25 जून 2025 रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यावल पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी यावल-चोपडा रोडवरील फॉरेस्ट कॉलनी परिसरात सापळा रचला. तपासादरम्यान स्प्लेंडर मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेले आरोपी
अटक करण्यात आलेले आरोपी खालीलप्रमाणे –
1. युसुफ शहा गुलजार शहा (वय 55 वर्षे, रा. मुस्लिम कॉलनी, ताज हॉटेल जवळ, खडका रोड, भुसावळ)
2. युनूस सुलतान शेख (वय 51 वर्षे, रा. गरीब नवाज मशीद जवळ, खडका रोड, भुसावळ, मूळ रा. सुरत, गुजरात)
सदर दोन्ही आरोपींकडून ४ किलो गांजा व स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
गांजाची खरेदी-विक्रीची माहिती
तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी भानसिंग पुट्ट्या बारेला (रा. वाघझिरा, ता. यावल) याच्याकडून रु. 15,000/- मध्ये गांजा खरेदी केला होता. हा गांजा ते किनगाव-यावल मार्गे भुसावळ येथे विक्रीसाठी नेत होते. या माहितीच्या आधारे आरोपी भानसिंग पुट्ट्या बारेला यालादेखील अटक करण्यात आली आहे.
न्यायालयीन कारवाई
सदर तिन्ही आरोपींना आज दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी यावल न्यायालयात हजर केले असता, त्यांना 03 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते –
स.पो.नि. अजयकुमार वाढवे,पोउनि अनिल महाजन ,सफौ/704 विजय पाचपोळे,पोहेकॉ 3070 रोहिल गणेश,पोना 3244 वसीम तडवी,पोना 3095 अमित तडवी,पोकॉ/1192 आर्षद गवळी,पोकॉ/411 सागर कोळी ,चापोहवा ज्ञानेश्वर सपकाळे
या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. अजयकुमार वाढवे करत आहेत.