धानवड-शिरसोली गटात राजकीय वारे बदलणार? भावी जिल्हा परिषद सदस्य कोण?
भावी जिल्हा परिषद सदस्य कोण? — जनता म्हणते, “आता आमचं वजन भारी!” ⚖️

जळगाव (प्रतिनिधी) —जळगाव टोकातील धानवड-शिरसोली गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची चुरस आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या गटात अनेक दिग्गजांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी जनतेचा कल मात्र “काम करणाऱ्या” आणि “सर्वांगीण विकास करणाऱ्या” उमेदवाराकडे झुकताना दिसत आहे.
राजकारणात वजन असलेले, मोठे पाठबळ असलेले नेते असले तरी जनतेच्या कामासाठी मागे उभा राहत नसेल तर लोक आता त्याला निवडून देत नाहीत. गावोगावी विकासाचे प्रश्न, रस्ते, पाणी, शिक्षण आणि तरुणांसाठी संधी — या विषयांवर काम करणाऱ्यालाच मतदार साथ देतील, असा स्पष्ट कल ग्रामीण भागात दिसत आहे.
या गटातील भावी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत, पण जनतेने आता ठरवले आहे — “जो आमच्यासोबत उभा राहील, त्याच्यासोबत आम्ही उभे राहू!”
दरम्यान, काही माजी सदस्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता देखील चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांत स्वतःची ओळख निर्माण केलेल्या काही नावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या या लढतीत जनतेचं पारडं कोणाच्या बाजूला झुकणार, कोणाचा प्रभाव वाढणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
-
जनता ठरवेल खरा जनसेवक कोण. नाव लवकरच पुढील बी बातमीत येणार.