बातम्या

जळगाव: एमआयडीसीतील चटई कंपनीला आग; आटोक्यात येण्याची लक्षणे अद्याप दिसत नाहीत

जळगाव, 29 डिसेंबर: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात स्थित सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाच्या चटई कंपनीला रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या तीव्रतेमुळे कंपनीच्या संपूर्ण परिसरात मोठा धुर आणि ज्वाला निर्माण झाल्या आहेत. आग लागल्यामुळे कंपनीतील चटई आणि प्लास्टिक दाण्यांसारखे ज्वलनशील पदार्थ सहजपणे जळू लागले आणि आग तात्काळ पसरली.घटनेची माहिती मिळताच जळगाव अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तासाभरात ४ ते ५ अग्निशमन बंब वापरण्यात आले, तरीही आग आटोक्यात येण्याची लक्षणे अद्याप दिसत नाहीत. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ उडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.काही वेळापूर्वी कंपनीत गॅस सिलेंडरचा स्फोट देखील झाला. प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी याची माहिती दिली आहे. त्यानंतर परिसरात आणखी सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले आहेत, पण तीव्रतेमुळे आग नियंत्रणात आणणे अवघड झाले आहे.पोलिस विभागाने घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत. नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याची सूचना देण्यात आली आहे.कंपनीच्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अद्याप आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे, आणि अधिक माहिती प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!