लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

भुसावळ, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दीपनगरयेथील एका भागात राहणाऱ्या ३८ वर्षीयमहिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचारकेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी बुधवारी रात्री १० वाजता भुसावळतालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
भुसावळ तालुक्यातील दीपनगर गावातील एका भागात ३८ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या महिलेची ओळख हार्दीक हेमचंद्र सोनी रा. दीपनगर, ता. भुसावळ याच्याशी तीन वर्षांपुर्वी ओळख निर्माण झाली, यावेळी हार्दीक सोनी याने महिलेला लग्नाचे आमिष दखवत वेळोवेळी अत्याचार केला, त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने सोबतचे आक्षपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून मारहाण केली.
हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने थेट भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी हार्दीक हेमचंद्र सोनी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे हे करीत आहे.