विनोद सुधाकर पवार यांना गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ कडून मानद डॉक्टरेट पदवी

जळगाव, दि. १८ एप्रिल — समाजसेवा, गांधीवादी विचारसरणीचा प्रचार आणि लोककल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विनोद सुधाकर पवार, जळगाव यांना गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ यांच्यावतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
हा गौरव समारंभ १८ एप्रिल २०२५ रोजी जळगाव येथील हॉटेल IvoryTusk येथे अत्यंत सन्मानपूर्वक पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. राजू मामा भोळे (जळगाव शहर) हे होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत सुनील सिंग परदेशी (कर्तव्यदक्ष फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष, नाशिक) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
स्पा सेंटरवर छापा – पोलिसांचा सर्जिकल अॅक्शन
समारंभात विनोद पवार यांना गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवीचे प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान त्यांच्याद्वारे आजवर सातत्याने समाजासाठी केलेल्या कार्याची पावती म्हणून सर्व उपस्थितांच्या साक्षीने देण्यात आला.
विनोद पवार यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात गांधी विचारांचे पालन करत निःस्वार्थ समाजसेवा केली. माणुसकीचे आणि सहिष्णुतेचे मूल्य जपत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांचे कार्य ही एक प्रेरणादायी कहाणी असून, आजच्या काळात समाजासाठी दिशा देणारे आहे.
गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ कडून मिळालेली ही पदवी त्यांच्यावरील विश्वास, कार्यावरील श्रद्धा आणि सामाजिक योगदानाची सार्वजनिक पावती आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!