बातम्या

फुलगावात ओपन स्पेसवर बसवलेली अनधिकृत गौतम बुद्ध मूर्ती हटविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू

४ महिने झाले, अजूनही कारवाई नाही!

वरणगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी पुष्पलता नगर (फुलगाव) येथील गट क्रमांक ३५/३७ मधील ओपन स्पेसमध्ये अज्ञात व्यक्तीकडून अनधिकृतरित्या गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात आली आहे. ही मूर्ती सिमेंटच्या चबुतऱ्यावर बसवून त्यावर शेड देखील उभारण्यात आले आहे. ही घटना दिनांक १३ मार्च २०२५ रोजी घडली असून, यासंबंधी प्रशासनाला तत्काळ माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी असून, त्यांनी फुलगाव ग्रामपंचायती समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

फक्त आधार कार्डवर ₹20,000 मिळवा १० मिनिटांत ₹20,000 खात्यात

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाकडून अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. याआधीही ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी निवेदने दिली असूनही प्रशासन फक्त आश्वासनांवर वेळ काढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दि. २ जुलै रोजी देखील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत फुलगाव कार्यालयासमोर उपोषण केले होते.

त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी ग्रामसभेत ७ जुलै रोजी कारवाईचा निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले होते. मात्र त्यानंतरदेखील कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी ग्रामस्थांनी दिनांक १६ जुलैपासून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्धार केला. या उपोषणात प्रल्हाद उत्तमराव जाधव, सुनिता राजेश मिस्तरी, सुनिता सुतार, मेघा संजय पाटील, सुमन प्रल्हाद जाधव, सोनी किशोर चौधरी, सुरेखा चौधरी, मिराबाई चौधरी, शोभा सोनार, शारदा चौधरी, माया चौधरी, सरला चंदले, संजय शशिकांत पाटील, दगडू झोपे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी आहेत. त्यांच्या स्वाक्षरीसह निवेदन सादर करण्यात आले आहे.

लालपरी प्रवाशांसाठी खुशखबर! आता राज्यातील ‘या’ लोकांना १००% मोफत प्रवास मिळणार

मूर्ती बसविण्याचा घटनाक्रम आणि पुढील घडामोडी

वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या फुलगावातील पुष्पलता नगर येथे दिनांक १४.०३.२०२५ रोजी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट क्रमांक ३५/३६ मधील मोकळ्या जागेवर सिमेंटचा चबुतरा बांधून पितळी पंचधातूची अंदाजे दीड फूट उंच गौतम बुद्धांची मूर्ती अज्ञात व्यक्तींनी बसवली. मूर्ती हटविण्याची मागणी करत दिनांक १६.०७.२०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून प्रल्हाद उत्तम जाधव आणि सोनी किशोर चौधरी यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू झाले. उपोषणस्थळी १०-१५ नागरिक सतत उपस्थित असतात.

यासंदर्भात ग्रामसेवकांनी माहिती दिली की, १५ जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात यासंबंधी बैठक झाली. त्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, मूर्ती हटवण्यासंबंधी ग्रामपंचायतीने ठराव करून तो गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे पाठवण्यात येईल. मात्र, उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत.

माध्यमिक शिक्षण विभागाकडून माहिती लपवली जातेय?

अधिकाऱ्यांचा दौरा आणि उपोषणकर्त्यांची भूमिका

दि. १७.०७.२०२५ रोजी सायं. ४ वाजता भुसावळ गटविकास अधिकारी श्री. फुलझडे, वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय श्री अमित बागुल, विस्तार अधिकारी श्री गौतम वाढे, ग्राम विकास अधिकारी श्रीमती मिना तायडे, सरपंच श्री शाम फुलगावकर, उपसरपंच श्री सिद्धांत चौधरी यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी २०-२५ ग्रामस्थ उपस्थित होते. गटविकास अधिकारी यांनी १५ ते २० दिवसांचा वेळ मागितला. मात्र, दिलेल्या पत्रावर कोणताही अधिकृत शिक्का नसल्याने उपोषणकर्त्यांनी ते अस्वीकार करून उपोषण सुरूच ठेवले.

उपोषणकर्त्यांचा ठाम अभिप्राय प्रल्हाद जाधव, सुनिता मिस्तरी, सुनिता सुतार, मेघा पाटील, सुमन जाधव, सोनी चौधरी, संजय पाटील यांचे म्हणणे आहे की, मूर्ती बसवून ६ महिने झाले तरी प्रशासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही. प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस देखील आम्हाला बोलावण्यात आले नाही. जोपर्यंत सक्षम अधिकारी मूर्ती हटवून आमच्या हक्काची जागा रिकामी करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. ग्रामसभेत मूर्ती हटविण्याचा ठराव आम्हाला मान्य असून, प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करावी.

UPI व्यवहाराचे चे नवीन नियम लागू होणार का

सामाजिक पार्श्वभूमी फुलगाव गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ५००० ते ५५०० आहे. त्यामध्ये ४५० ते ५०० बौद्ध, ३५०० ते ४००० लेवा पाटील समाजाचे नागरिक असून उर्वरित इतर धर्मीय आहेत. सध्या उपोषण करणारे सर्व नागरीक हे लेवा पाटील समाजाचे आहेत.

गावात लेवा पाटील समाजाची बहुसंख्या असल्यामुळे सरपंचपद आणि बहुतेक ग्रामपंचायत सदस्य त्याच समाजातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे ग्रामसभेत मूर्ती हटविण्याचा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.पुष्पलता नगर हा भाग नवीन वसाहत असून, मूर्ती बसवलेली जागा ही ओपन प्लेस आहे. त्या परिसरात बौद्ध समाजाची फक्त ८ ते १० घरे आहेत तर बहुसंख्य लेवा पाटील समाजाची घरे आहेत. या गावात पूर्वी कोणतीही जातीय घटना घडलेली नाही. त्यामुळे सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाही.

पुढील संभाव्य परिणाम जर मूर्ती हटविण्याचा ठराव मंजूर होऊन प्रत्यक्ष कारवाई झाली, तर बौद्ध समाजाच्या वतीने गावातील इतर ठिकाणी केलेल्या अतिक्रमणांवरही कारवाईची मागणी होण्याची शक्यता आहे.गटविकास अधिकारी यांच्याकडून मूर्ती हटविण्याच्या बाबतीत ठोस लेखी आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेतले जाऊ शकते, असा अंदाज आहे.

उपोषणकर्त्यांची मागणी – तत्काळ चौकशी व न्याय देण्यात यावा!
जळगाव जिल्हाधिकारी, भुसावळ प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे चौकशी करून या प्रकरणात लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा, हीच उपोषणकर्त्यांची ठाम मागणी आहे.

ई-श्रम योजना काय आहे? फायदे, पेन्शन, विमा – सविस्तर माहिती येथे!

“शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! नवी पीकविमा योजना लागू!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!