जळगावमध्ये दोन पोलिस हवालदारांना लाच घेताना रंगेहात पकडले

जळगाव:लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी आज (दि. 11 एप्रिल 2025) एक यशस्वी सापळा रचून दोन पोलिस हवालदारांना लाच घेताना रंगेहात पकडले.
घटनेचा तपशील:
तक्रारदार हे केंद्रीय अर्धसैनिक दलात कार्यरत असून, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे त्यांच्या पत्नीने दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोपी Ravindra Sonar यांनी तक्रारदारास पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर आरोपी Ravindra Sonar व Dhanraj Nikumbh यांनी एकत्रितपणे गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे 50,000 रुपये लाच मागितली.
त्यानुसार, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान आरोपींनी 50 हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती 20,000 रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज दि. 11 एप्रिल 2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान Ravindra Sonar यांनी 20,000 रुपये लाच रक्कम स्वीकारली आणि त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
आरोपींची माहिती:
1. रविंद्र प्रभाकर सोनार – वय 47 वर्षे, हवालदार, जळगाव शहर पोलीस ठाणे
2. धनराज निकुंभ – हवालदार, जळगाव शहर पोलीस ठाणे
लाच मागणीची तारीख: 11/04/2025
लाच स्वीकारलेली रक्कम: 20,000 रुपये
गुन्हा दाखल: कलम 7, 12 (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा व तपास अधिकारी:
श्रीमती स्मिता नवघरे,
पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
पर्यवेक्षण अधिकारी:
श्री. योगेश ठाकूर,
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
सापळा पथकातील सदस्य:
पोउपनिरीक्षक सुरेश पाटील (चालक),
पोहेकॉ रविंद्र घुगे,
पोहेकॉ जनार्दन चौधरी (चालक),
पोहेकॉ सुनील वानखेडे,
पोना बाळू मराठे,
पो.कॉ. राकेश दुसाने
मार्गदर्शक अधिकारी:
मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र.
मोबा. नं. 91 93719 57391
—
सर्वसामान्य जनतेस आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी सरकारी अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही लाचेची मागणी करत असल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:
दुरध्वनी: 0257-2235477
टोल फ्री क्रमांक: 1064