बातम्या

जामनेर शहरातील वाहतूक मार्गावर वेळेनुसार वाहतुकीची वर्दळ पाहुन आवश्यकतेनुसार ताप्तुरते बदल करणे

मा. मुख्यंमत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व उपमुख्यंमत्री राज्य मुंबई हे दिनांक ११/१०/२०२४ रोजी जळगांव जिल्हयाच्या दौरावर येणार असुन जामनेर शहरातील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत दि.११/१०/२०२४ रोजी जामनेर शहरातील वाहतूक मार्गावर वेळेनुसार वाहतुकीची वर्दळ पाहुन आवश्यकतेनुसार ताप्तुरते बदल करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झालेली आहे.त्याअर्थी मी डॉ. एम. रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव जिल्हा जळगांव, १९५१ च्या मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (१) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगाव शहरातील पुढील ठिकाणी आणि वेळी सर्व प्रकारच्या वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दि. ११/१०/२०२४ रोजी सकाळी १४.०० ते २०.०० वा पावेतो पुढील प्रमाणे आदेश देत आहे.तरी दि. ११/१०/२०२४ रोजी जामनेर शहरात नागरिकांच्या व वाहनधारकांच्या माहितीसाठी व सोयासाठी जामनेर शहरातील वाहतूक मार्गाचे ताप्तुरते बदल आपल्या लोकप्रीय दैनिकामध्ये प्रसिध्द करावे असे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे कळविण्यात येत आहे.भुसावळ ते छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहतुक (एस टी बसेस व इतर अवजड वाहनाकरीता ) पर्यायी मार्ग – भुसावळ-कु-हा पानचे बोदवड-जामनेर- पहुर- छत्रपती संभाजीनगर मार्ग.छत्रपती संभाजीनगर ते भुसावळ (एस टी बसेस व इतर अवजड वाहनाकरीता )पर्यायी मार्ग – पहुर -जामनेर (महाराणा प्रताप चौक) बोदवड कु-हा-भुसावळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!