बातम्या

भुसावळमध्ये 35 लाखांची चोरी! पोलिसांनी केली मोठी कारवाई

भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणारे व्यापारी नंदलाल मिलकीराम मकडीया यांच्या गायत्री नगरमधील राजस्थान मार्बल शेजारील पत्र्याच्या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली.

ही घटना दिनांक 15 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 16 जूनच्या सकाळी 8.40 या वेळेत घडली. चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि गोडाऊनमधील फ्रिज, वॉशिंग मशीन, ए.सी., एलईडी टीव्ही अशा एकूण ₹35,00,000 किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करून नेल्या.

या चोरीच्या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 295/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 305 (अ), 331(3), 331(4) प्रमाणे दिनांक 17 जून 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

🕵️ तपासात पोलिसांचे मोठे यश

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनसह स्थगुशा जळगाव व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनी समांतर तपास सुरु केला.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर, शिरपूर शहरातील करवंद रोडवरील महावीर लॉन्सजवळील एका खाजगी पत्र्याच्या गोडाऊनमध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाडसत्र राबवून, ₹18,80,000 किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. यातील उर्वरित मुद्देमालाबाबतही तपास सुरु आहे.

👮‍♂️ अटक आरोपी

गोडाऊन मालक आणि गुन्ह्याशी संबंधित असल्याचा संशय असल्याने खाजगी गोडाऊनचे मालक खालील दोघांना अटक करण्यात आली:

1. मुजावर जामील शेख चांद (वय 48), रा. न्यू बोराडी, ता. शिरपूर – सध्या रा. गणेश कॉलनी, शिरपूर.

2. जफर शेख मुजावर (वय 24), रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर, जि. धुळे.

 

👨‍✈️ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, पोलिसांची चमकदार कामगिरी

या कारवाईसाठी मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ श्री. कृष्णात पिंगळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

तपासाचे नेतृत्व पो.नि. श्री. राहुल टी. वाघ (भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन) यांनी केले.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:

पोहेकॉ उमाकांत पाटील, विजय नेरकर, संदीप धनगर

पोशि सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, जावेद शहा

स्था गु शाखा पथक: पोउनि. शेखर डोमाळे, रवी नरवाडे, गोपाळ गव्हाळे, मुरलीधर धरगर, संदीप चव्हाण, प्रविण भालेराव

चालक: भरत पाटील

भुसावळ तालुका पोलिस: महेश चौधरी, राहुल भोई

 

📌 पुढील तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, बाकी मुद्देमाल आणि इतर आरोपींविषयी शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि

समन्वयाने पार पडलेली कारवाई ही निश्चितच कौतुकास्पद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!