राज्य शासकीय सोसायटीने गुणवंत पाल्यांचा केला सन्मान

जळगाव जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढी लि., जळगाव या पतसंस्थेची ८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पाडली. प्रथम सत्रात गुणवंत पाल्य पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. डॉ. मारोती पोटे साहेब, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, जळगाव, प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुभाष गुंजाळ साहेब, अप्पर कोषागार अधिकारी, जळगाव, यांच्या उपस्थितीत संस्थेचे चेअरमन श्री. वसतं श्रीकृष्ण काळकर, व्हा. चेअरमन श्री. संतोष वसंत चौधरी व सर्व संचालक मंडळ व सन्माननीय सभासद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सदर प्रसंगी श्री. मारोती पोटे यांनी विदयार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आरोग्य व मैदानी खेळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले.सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार पतपेढीच्या वतीने रोख बक्षिस, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून करण्यात आला. संस्थेस आजपर्यंत कुठल्याही आर्थिक वर्षात तोटा झालेला नव्हता. व नाही यावर्षी संस्थेस रु. ४० लाख ५४ हजार ३४३ रुपये इतका नफा झालेला असल्याने कार्यकारी मंडळाने सभासदांना १४ टक्के लाभांश देण्याचे ठरवले होते परंतु मिटिंगमध्ये बहुसंख्य सभासदांच्या मागणीनुसार १५ टक्के ठरले. व मिटींग भत्ता रु. ८००/- देण्यात आला. संस्थेच्या पारदर्शक व्यवहारामुळे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनामुळे सर्व सभासदांच्या सहकार्याने व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेला आजपर्यंत लेखापरीक्षणात सतत वर्ग ‘अ’ प्राप्त झालेला आहे.


