बातम्या

एम.आय.डी.सी पोलिसांनी शस्त्रास्त्र जप्त करून आरोपीला अटक केली

दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी, एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना एका विश्वासार्ह सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली की, शुभम अनंता राउत (वय 21), रा. भगवा चौक, सुप्रिम कॉलनी, या युवकाने स्वतःकडे एक शस्त्रास्त्र बाळगले असून, तो त्याचा वापर करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. या माहितीवर तात्काळ कारवाई करत, पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांना कळवून आवश्यक सूचना देण्यात आल्या.वरील निर्देशानुसार, एम.आय.डी.सी पोलिस स्टेशनचे एक पथक तयार करण्यात आले, ज्यामध्ये पो.उप.निरी. चंद्रकांत धनके, पो. काँ छगन तायडे, पो.शि. गणेश ठाकरे, आणि पो.शि. शिद्धेश्वर डापकर हे सदस्य होते. पथकाने तत्काळ सुप्रिम कॉलनीतील तलाव परीसरात जाऊन, शुभम राउतला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या जवळ एक एअर गन सापडली, जी गावठी कट्टयासारखी दिसत होती. त्यानंतर, त्याला चौकशीसाठी विश्वासात घेतले असता, त्याने खुलासा केला की त्याचा मित्र बंटी तायडे (रा. तायडे गल्ली, जळगाव) कडे एक पिस्टल आहे.शुभम राउतच्या दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ बंटी तायडेचा शोध सुरू केला. त्याच्या घरी जाऊन त्याला शोधले, पण तो घरात सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी बंटी तायडेच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान, पोलिसांना त्याच्या घरात एक गावठी पिस्टल सापडली. त्या पिस्टलला पंचासमक्ष जप्त करण्यात आले.यावरून, शुभम राउत आणि बंटी तायडे यांच्या विरोधात एम.आय.डी.सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला. सदर गुन्हा आर्म अॅक्ट कलम 3/25 आणि मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. शुभम राउतला अटक करण्यात आली असून, बंटी तायडेचा शोध सुरू आहे.सदर गुन्ह्याचा तपास पो.उप.निरी. चंद्रकांत धनके आणि पो. काँ योगेश घुगे हे करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही असामान्य किंवा संशयास्पद कृती पाहिल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!