बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचा समारोप

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जी.एस. ग्राउंड (शिवतीर्थ मैदान) येथे सुरू असलेल्या भव्य महोत्सवाचा समारोप दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारोप सोहळ्यात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी विविध शालेय संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून आदर्श शिक्षकांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव म्हणजे एक सुवर्णसंधी असून त्यांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन करिअरच्या योग्य दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दररोज विविध आकर्षक बक्षिसांसह कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. या महोत्सवाचे नियोजन स्वरराज इव्हेंट्सतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दु. क्रमांक १०, तळमजला, रामभाऊ जोशी मार्केट, गोलाणी मार्केटसमोर, जळगाव येथे संपर्क साधावा किंवा 8668416383, 993278904, 9175675651 या क्रमांकावर माहिती मिळवता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!