‘या’ मंत्र्याच्या प्रयत्नांनी माजी सैनिकांना मिळणार न्याय; भुसावळ मेस्को वेतनावर मुंबईत हाय-व्होल्टेज चर्चा!
दीपनगर माजी सैनिकांवरील अन्याय संपणार! संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश? मुंबईत मोठी बैठक!

भुसावळ: बी.टी.पी.एस. दिपनगर, भुसावळ येथील महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) पुणे अंतर्गत सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या माजी सैनिक सुरक्षा कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या वेतनातील अन्यायावर तातडीने तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे यांनी या माजी सैनिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून, त्यांच्या प्रयत्नांतूनच ही बैठक लावली गेली आहे. या बैठकीतून माजी सैनिकांच्या हिताचा सकारात्मक निर्णय होईल आणि त्यांना न्याय मिळेल अशी तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे.
मा. मंत्री, पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री, सातारा यांच्या सूचनेनुसार, ही बैठक सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे होणार आहे.
अनियमित वेतनामुळे माजी सैनिकांवर अन्याय
मेस्को अंतर्गत सेवेत असलेल्या माजी सैनिकांना बी.टी.पी.एस. दिपनगर येथे काम करताना त्यांच्या कामाच्या तुलनेत वेतनामध्ये मोठी तफावत (Salary Disparity) जाणवत आहे. देशसेवा केलेल्या या सैनिकांना सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या योगदानानुसार योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक अन्याय होत असल्याची भावना आहे. हाच अन्याय दूर करण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे.
बैठकीचा प्रमुख विषय आणि उपस्थिती
बैठकीचा प्रमुख विषय ‘बी.टी.पी.एस. दिपनगर भुसावळ येथील नियुक्त महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणे सुरक्षा कामगार यांच्या वेतनातील तफावतबाबत’ हा आहे. या महत्त्वपूर्ण विषयावर निर्णय घेण्यासाठी ऊर्जा विभाग, वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मेस्को आणि महानिर्मितीचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
बैठकीची व्यवस्था व निमंत्रण
मा. मंत्री, पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री, सातारा यांनी या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीची व्यवस्था संबंधित विभागाने करावी आणि खालील प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित करावे असे सूचित करण्यात आले आहे:
१. मा.ना.श्री. संजय सावकारे, मा. मंत्री वस्त्रोद्योग २. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग ३. अपर मुख्य सचिव, ऊर्जा विभाग, मंत्रालय ४. व्यवस्थापकीय संचालक, मेस्को, घोरपडी, पुणे ५. मुख्य व्यवस्थापकीय संचालक, महा निर्मिती, ऊर्जा विभाग ६. संचालक (वित्त) महानिर्मिती, ऊर्जा विभाग ७. संचालक, (मनुष्यबळ) महानिर्मिती, ऊर्जा विभाग ८. मुख्य अभियंता, भुऔष्णिक विद्युत, जळगाव ९. औद्योगिक संबंध अधिकारी, भुसावळ १०. इतर संबंधित अधिकारी
बैठकीच्या व्यवस्थेबाबत सूचना
- बैठकीच्या विषयाशी संबंधित सविस्तर टिप्पणी आणि वेतनातील तफावत दूर करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व शासन निर्णयाच्या प्रती बैठकीच्या आधी संबंधित विभागाने उपलब्ध करून द्याव्यात.
- बैठकीचा विषय हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक आणि कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक सूचना पत्रात नमूद करणे अनिवार्य आहे.
- बैठक झाल्यानंतर ५ दिवसांच्या आत बैठकीचे इतिवृत्त (Minuets) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.