युवासेना कार्यअध्यक्ष श्री. पुर्वेशजी सरनाईक यांचा “युवा विजय महाराष्ट्र दौरा” २ मार्च रोजी जळगावात

जळगाव, दि. २८ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) युवासेना कार्यअध्यक्ष श्री. पुर्वेशजी सरनाईक यांच्या “युवा विजय महाराष्ट्र दौरा” अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात २ मार्च २०२५ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी विशेष बैठकींसह स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
श्री. पुर्वेशजी सरनाईक यांचे २ मार्च रोजी सकाळी १०:३० वा. जळगाव विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११:०० वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे जिल्ह्यातील विधानसभा व लोकसभा मतदारसंघ निहाय विशेष बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्याचा मुख्य उद्देश युवासेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे आणि आगामी राजकीय दिशा निश्चित करणे हा आहे. या महत्वपूर्ण दौऱ्यासाठी युवासेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनी केले आहे.