बातम्या

इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्षक,पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न…!


🔴 अपयशात खचून न जाता धैर्याने सामोरे जावे – डॉ पवन राजपूत

जामनेर:- जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचा आज दु.१२ वाजता बाबाजी राघो मंगल कार्यालय येथे इयत्ता ११ वी मध्ये नवीन प्रविष्ट झालेल्या  विद्यार्थ्यांसाठी शिक्षक, पालक विद्यार्थी मेळावाचे आयोजन करण्यात आले,
               सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी डॉ.पवन राजपूत(जळगांव), धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक गजानन अवटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून मेळावाचे उद् घाटन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी तथा फिनिक्स अकॅडमी संचालक सचिन पाटील, इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, ज्येष्ठ संचालक श्रीराम नाना महाजन, संचालक संजय महाजन, संचालक भगवान बेनाडे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.
           प्रास्ताविक मुख्याध्यापक एस आर चव्हाण तर पाहुण्यांचा परिचय प्रा.सुमित काबरे यांनी केले.
          महाविद्यालयात वर्षभर राबविले जाणारे विविध उपक्रम- सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक सहल, शालेय क्रीडा स्पर्धा,याविषयी मार्गदर्शन उपप्राचार्य प्रा.के एन मराठे यांनी केले.
             तर येत्या २ वर्षात विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी सराव पेपर नीट, सीईटी, जेईई इ. परीक्षेला सामोरे कसे जावे व तयारी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.संजय क्षिरसागर यांनी केले,
            मध्यंतरमध्ये क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी विद्यार्थ्यांकडून रिक्रेशन ऍक्टिव्हिटी करून घेतली.
            इ. १२ वीतील विद्यार्थी पलक ओसवाल, दर्शना रोकडे, उदय पाटील यांनी नीट, सीईटी अभ्यास बद्दल मनोगत व्यक्त केले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता महाजन यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.दिनेश महाजन यांनी केले.
             याप्रसंगी इ.११वी विज्ञान, कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून इ.१० वी सर्वात जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पेन, गुलाबपुष्प भेट देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे:-
*विज्ञान शाखा:* अनुष्का केशव निमगडे (९७.६०% ),  न्हावी सलोनी समाधान (९५.२०%),  टोंगळे नितीश संदीप (९४.८०%),  मिस्तरी मितल गोपाल (९४.४०%),  पाटील अथर्व प्रफुल्ल(९४ %).
*कला शाखा:* मोरे योगिता सुनील (८३.६०%), जोहरे कुणाल सुधाकर (७६.८०%)
*वाणिज्य शाखा:* बढे दिपेश यशवंत (८६.४०%), गवळी भावेश दीपक (८३.४०%)
              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.
————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!