बातम्या
महापालिकेत फसवणुकीचा स्फोट! नागरिकांच्या जीवाशी खेळ – नावं पाहून थक्क व्हाल!

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट दाखले मिळवण्यासाठी मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. तब्बल ४३ नागरिकांनी नायब तहसीलदारांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून खोटे दाखले घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे महानगरपालिकेच्या नोंदणी व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा धक्का बसला आहे आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.