४६ सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत बूस्टर पंप चेंबरी येथे गणपती बाप्पाचे आगमन

भुसावळ, ता. २८ ऑगस्ट ( प्रतिनिधी प्रवीन पाटील ) – दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असलेल्या अॅक्युरेट सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या सुरक्षारक्षकांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव २०२५ साजरा केला आहे. एश बंड पाईपलाईन विभागात कार्यरत असलेल्या एकूण ४६ सुरक्षारक्षकांनी बूस्टर पंप चेंबरी येथे श्री गणरायाची प्रतिष्ठापना करून उत्सवाचे आयोजन केले.
गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट, फुलांच्या आरास आणि रोषणाईने परिसर सजविण्यात आला होता. सकाळी मंत्रोच्चारांच्या गजरात गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली. सुरक्षारक्षकांसह औष्णिक केंद्रातील कर्मचारी यांनी दर्शन घेऊन आरतीत सहभागी होत गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण अनुभवले.
या प्रसंगी सुरक्षारक्षकांनी एकत्र येऊन सामूहिक आरती, प्रसाद वितरण केले. गणेशोत्सवाचे सर्व विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅक्युरेट सिक्युरिटी सर्व्हिसेसचे सुरक्षा रक्षक यांनी खूप चागल्या प्रयत्न पार पडले
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, एकता आणि धार्मिकतेची भावना निर्माण झाल्याचे समाधान सुरक्षारक्षकांनी व्यक्त केले.
तसेच, हा उत्सव पाच दिवस चालणार असून दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, भजन, प्रसाद वाटप व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विसर्जन सोहळा पारंपरिक पद्धतीने भुसावळ येथील वेल्हाळे तलाव येथे करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.