सुनील पाटील उपसरपंच! गावात जल्लोष आणि फटाके

जळगाव श्री मराठी न्यूज । ८ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण तालुक्यातील आसोदा गावात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घटना घडली आहे. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे कट्टर समर्थक श्री. सुनील पाटील यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड गावाच्या सामाजिक आणि राजकीय एकतेचे प्रतीक मानली जात आहे.
श्री. सुनील पाटील यांना सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला.कोणत्याही विरोधी उमेदवाराने अर्ज न भरल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सुनील पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी एकजुटीने साथ दिली, त्यात खालील सदस्यांचा समावेश होता ग्रा.प.सदस्य तुषारभाऊ महाजन.वर्षा गिरीश भोळे. वैशाली संभाजीराव पाटील. लता सुभाष महाजन.योगीता शरद नारखेडे. पुजा नरेंद्र नारखेडे. महेंद्र जोहरे. जीवन सोनवणे. संजोग कोळी. बाळकृष्ण पाटील. अनिल कोळी. गजुदादा सावदेकर.नरेंद्र नारखेडे.धनंजय कोल्हे. संजय बिर्हाडे.किशोर चौधरी.प्रकाश माळी. अजय महाजन.ललित कोळी. हरीश भोळे. चंदन बिर्हाडे. मंगेश पाटील. सतिश डोळसे.यांचे अनमोल सहकार्य लाभले.या निवडीनंतर गावात जल्लोषाचे वातावरण आहे. सुनील पाटील यांच्या नेतृत्वात गावाच्या विकासासाठी नवे उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.
ही निवड केवळ राजकीय नाही, तर सामाजिक सलोख्याचे उदाहरण ठरली आहे. सुनील पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा!