“लाचखोर तलाठ्यावर लाचलुचपत विभागाचा यशस्वी सापळा”

जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथे एका तलाठ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. महेशकुमार भाईदास सोनावणे (वय 50), असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
▪️लाच मागणी आणि तडजोड
तक्रारदार व त्यांच्या भावाच्या N.A. झालेल्या 9 प्लॉटवर नोंदी लावून देण्यासाठी तलाठी सोनावणे यांनी 10,170 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 6,000 रुपये देण्याचे ठरले. दिनांक 27/02/2025 रोजी लाच स्वीकारताना तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
▪️गुन्हा दाखल
या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
▪️यशस्वी कारवाई करणारे अधिकारी
✅ मार्गदर्शन: मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नाशिक परीक्षेत्र
✅ पर्यवेक्षण अधिकारी: श्री योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. जळगांव
✅ सापळा अधिकारी व तपास अधिकारी: श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. जळगांव
✅ सापळा पथक: पो.हे.कॉ. किशोर महाजन, पोकॉ. राकेश दुसाणे, पोकॉ. पोळ
▪️नागरिकांना आवाहन
जनतेने कुणीही लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
☎️ दूरध्वनी क्रमांक: 0257-2235477
📞 टोल फ्री क्रमांक: 1064
“प्रामाणिक नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहावे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवावा!”