यशस्वी सापळा कारवाई – सहायक अभियंता रंगेहात पकडला

जळगाव – नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी 5,500 रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
प्रकरणाचा तपशील
▶ युनिट – जळगाव
▶ तक्रारदार – 23 वर्षीय पुरुष
▶ आरोपी लोकसेवक – अमित दिलीप सुलक्षणे (वय 35), व्यवसाय – सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, चोपडा शहर कक्ष २, रा. प्लॉट नं. 60, बोरोले १, चोपडा, जि. जळगाव (वर्ग -2)
▶ लाचेची मागणी – दिनांक 11 मार्च 2025 रोजी 5,500/- रुपये
▶ तडजोडीनंतर स्विकारलेली लाचेची रक्कम – दिनांक 12 मार्च 2025 रोजी तडजोडीनंतर 4,500/- रुपये
घटनाक्रम
तक्रारदार यांनी त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी सहायक अभियंता अमित सुलक्षणे यांनी 5,500 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दिनांक 11 मार्च 2025 रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. तक्रारीची खात्री करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, आरोपीने प्रथम 5,500 रुपये लाचेची मागणी केली आणि तडजोडीनंतर 4,500 रुपये स्वीकारण्यास तयार झाला.
दिनांक 12 मार्च 2025 रोजी आरोपीने तडजोडीनंतर 4,500 रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे सक्षम अधिकारी
मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, जळगाव
मार्गदर्शन व पर्यवेक्षण अधिकारी
▶ मार्गदर्शक – मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परीक्षेत्र, नाशिक (मो. 9371957391)
▶ पर्यवेक्षण अधिकारी – श्री योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, जळगाव विभाग
सापळा व तपास अधिकारी
▶ श्रीमती नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
सापळा कार्यवाही पथक
▶ श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील
▶ पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर
▶ पोलीस नाईक मराठे
▶ पोलीस नाईक राकेश दुसाने
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे सरकारी कामांसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात मोठा संदेश गेला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांची तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.