बातम्या

जळगावात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई!

जळगाव, दि. १३ जून २०२५: पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी विशेष वाहतूक मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. एकूण २४६ प्रकरणांमध्ये कारवाई करत १,८८,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या मोहिमेतील कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

1. विना हेल्मेट वाहनचालक – २० प्रकरणे

वसूल दंड: ₹२०,०००

2. फॅन्सी नंबर प्लेट – २२ प्रकरणे

वसूल दंड: ₹११,०००

3. परवाना नसताना वाहन चालवणे – ६४ प्रकरणे

वसूल दंड: ₹४४,०००

4. दारू पिऊन वाहन चालवणे (Drunk & Drive) – २ प्रकरणे

कायदेशीर कारवाई करण्यात आली

5. सिग्नल उलंघन (Signal Jumping) – ११ प्रकरणे

वसूल दंड: ₹५,५००

6. कलम ६६/१९२ अंतर्गत गुन्हे – २ प्रकरणे

कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू

7. इतर विविध गुन्हे (जसे की चुकीचे पार्किंग, ट्रॅफिक रांग मोडणे, ओव्हरलोडिंग इ.) – १२५ प्रकरणे

संबंधित दंड व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण

या मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती निर्माण करणे आणि शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी कठोर पावले उचलणे हा होता.

पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सांगितले की, “शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी कायदे पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाहतूक शाखेच्या कारवाया भविष्यातही सातत्याने सुरू राहतील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!