नेहा देशमुखला श्री शिवछत्रपती पुरस्कार जाहीर सॉफ्टबॉल खेळाडूला पालकमंत्री यांची आर्थिक मदत

जळगाव शहरातील शिव कॉलनी येथे राहणाऱ्या क्रीडा शिक्षिका यांना नुकताच राज्य शासनाच्या श्री शिछत्रपतीं पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मात्र परिस्थिती बेताची असल्याने पालकमंत्री यांनी त्यांना 25 हजार रुपये देऊन त्यांना आर्थिक मदत दिली.जळगाव मधील सॉफ्टबॉल खेळाडू नेहा देशमुख हिला नुकताच राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने दिला जाणारा श्री शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. तर दुसरीकडे नेहा देशमुख हिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. याबद्दल नेहा देशमुखचा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या क्रीडा शिक्षिका असून दररोज जळगाव ते पाचोरा जाऊन येऊन करतात. तैवान येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये भारताच्या संघात त्यांची निवड झालेली असताना परिस्थिती बेताची असल्याने पालकमंत्री यांनी लागली त्यांना 25 हजार रुपये रोख अशी आर्थिक मदत केली. नेहा देशमुख यांचे वडिलांचे निधन झालेले आहेत