बातम्या

श्री अष्टभुजा मित्र मंडळ, ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव.

श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. देवयानी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्ष हेमलता पाटील व संस्थापक अध्यक्ष सुनील(बंटी) भारंबे यांच्या पुढाकारातून श्री अष्टभुजा मित्र मंडळाचा दुर्गोत्सव मध्ये मागील 12 वर्षांपासून सामाजिक जनजागृतीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे देखाव्यांचे सादरीकरण होत असते; त्यात मागील वर्षी रेणुका मातेचे माहूर गडाची प्रतिकृती देखावा केला होता. तसेच, मंडळातर्फे दुर्गोत्सव मध्ये अत्यंत प्रिय असलेला गरबा, दांडिया आणि दशमा दरवर्षी आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे विविध भागांतून निर्माल्य संकलनाचे काम करण्यात येते आहे. *यावर्षी केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती अती प्राचीन कालीन देवाधी देव महादेव भगवानचे केदारनाथ मंदिर पवित्र हिंदू धर्माची वास्तूकला उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या मंदिराची प्रतिकृती श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड येथे उभारण्यात आली आहे*केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. (गौरीकुंडहून १४ किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते) मंदिराची प्रतिकृती श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड येथे उभारण्यात येत असून सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील (बंटी) भारंबे, संस्थेचे सचिव मुविकोराज कोल्हे यांनी माहिती दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!