बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत जळगाव शहरातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर.

जळगाव शहरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण होऊन काही प्रगती पथावर असून आमदार सुरेश भोळे (राजुमामा) हे सतत शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणणेसाठी प्रयत्नशील आहेत. प्रमुख रस्त्यांच्या विकासामुळे जळगाव शहरवासी सुखावले असून दलित वस्ती विकासासाठी आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी पुन्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये शहरातील दलित वस्तीतील रस्ते कॉक्रीटीकरण, गटारी बांधकाम, ओपन स्पेस विकसित करणे या कामांचा समावेश आहे. सदर मंजुरी करिता उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.सदर मंजुरी बाबत आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी मुख्यमंत्री ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, ना. श्री. अजितजी पवार साहेब, मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री ना.श्री.गुलाबरावजी पाटील, ना. श्री. अनिलजी पाटील साहेब यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!