शिवसेना शिंदे गटाचा मनपावर हल्लाबोल : नागेश्वर कॉलनीतील बालकाच्या मृत्यू प्रकरणी तीव्र संताप

जळगाव | प्रतिनिधी
रविवार, 1 जून 2025 रोजी नागेश्वर कॉलनी येथे एक हृदयद्रावक घटना घडली. पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय निरागस बालक अरविंग सचिन गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला. कुत्र्यांनी चेहऱ्यावर, मानेवर व गळ्यावर जोरदार हल्ला करत त्याचे लचके तोडले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेनेच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करत याप्रकरणी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रशासनाला थेट सवाल:
शिवसेनेने आपल्या निवेदनातून आयुक्तांना थेट काही प्रश्न उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे:
-
महानगरपालिकेची श्वाननिरोधक यंत्रणा प्रत्यक्षात सुरु आहे का?
-
आरोग्य अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही दुर्दैवी घटना घडली का?
-
पिसाळलेल्या कुत्र्यांच्या लसीकरण व निर्बिजीकरणाचा ठेका कोणत्या संस्थेला दिला आहे आणि त्या संस्थेचे कामकाज महापालिका तपासते का?
-
कुत्र्यांच्या चाव्यांनंतर देण्यात येणाऱ्या अँटी रेबीज लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का?
पोलीस दलात मोठा फेरबदल! कोण कोठे गेले, पाहा संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
पुढील इशारा
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला इशारा दिला आहे की, या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना तीव्र स्वरूपात आंदोलन छेडेल. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे, पण ती स्पष्टपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
अतिक्रमण व हप्तेबाजीचा आरोप
या प्रसंगी शिवसेनेने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते, “प्रशासनातील काही अधिकारी अतिक्रमणधारकांकडून मासिक हप्ते घेत आहेत, म्हणूनच समस्या कायम आहेत.” त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येकडे कोणीही लक्ष देत नाही, असा आरोप शिवसेनेच्या प्रतिनिधींनी केला.
उपस्थित शिवसेना पदाधिकारी:
या निवेदनप्रसंगी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सरिता माळी कोल्हे, शोभा चौधरी, भारती रंधे, ज्योती शिवदे, डॉ. सुषमा चौधरी, दीपमाला सुरवाडे, संतोष पाटील, ऍड. दिलीप पोकळे, सचिन सोनार, राहुल संगीले, सागर हिरवाळे, सचिन शिवदे, चेतन सनकत यांचा समावेश होता.
जळगावच्या रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; शिवसेना उबाठा आक्रमक!
मागणी
-
मोकाट कुत्र्यांवर तात्काळ नियंत्रण आणावे.
-
निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहीम तातडीने राबवावी.
-
मृत बालकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व न्याय मिळावा.
-
दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी.
ही घटना फक्त नागेश्वर कॉलनीपुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण जळगाव शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करते. प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे.