राजकारण

सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल

धरणगाव /जळगाव दि. 24 : – महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सुमारे २० हजाराच्यावर कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेनेची मुलुख मैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन ना. पाटील यांची भव्य रॅली सुरू झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून हजारोंच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या रॅलीत गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले.

सभेत गुलाबराव पाटील यांनी शेरो-शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीका केली. “जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हे माझ्यासाठी टॉनिक आहे,” असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले आणि विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आगामी निवडणुकीत कोणताही निष्काळजीपणा न करता १ महिना मेहनत घ्यावी. तुमच्यासह व लाडक्या बहिणीच्या मेहनतीने व साथीने विरोधकांच्या छाताडावर भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही याची १०० % खात्री आहे.

येत्या २७ तारखेला श्री क्षेत्र पद्मालय येथे प्रचार नारळ फोडणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अर्ज दाखल करून आल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, गुलाबभाऊ हे पाचव्यांदा निवडणूक लढवत असून देखील पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी अर्ज भरतांना दिसून आल्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा आशावाद ना. गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.*पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आज धरणगावात अक्षरश: जनसागर उसळल्याने शहरात भव्य यातेचे स्वरूप होते. मतदारसंघातील विविध गावांमधून हजारोंच्या संख्येने समर्थकांनी वाजत-गाजत – नाचत धरणगाव गाठले.अनेक गावांमधील हजारो तरुणानी घोषणांनी जोरदार जयघोष करत दुचाकी रॅलीच्या माध्यमातून धरणगाव गाठून रॅली व सभेला हजेरी लावली. सर्वात पहिल्यांदा ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगावचे दैवत मानल्या जाणाऱ्या श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या विजयासाठी साकडे घातले. यानंतर एका उघड्या जीपवरून पालकमंत्र्यांची भव्य रॅली काढण्यात आली. बालाजी मंदिरापासून धरणी, धरणी बाजार, कोट बाजार, पी. आर. हायस्कूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही रॅली आली. संपूर्ण धरणगाव शहर हे भगवामय झाले होते. उघड्या जीपवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चंदू अण्णा सोनवणे, खा.स्मिताताई वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर महाजन, अनिल अडकमोल, शिवसेना, रॉ.कॉ. व भाजपाचे तालुकाध्यक्ष यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी विराजमान होते. यात सहभागी झालेल्या तरूणाईच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आल्याचे दिसून आले. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेसाठी दिनांक २४ रोजी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने आपला अर्ज दाखल केला.याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन म्हणाले व की, ही सभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नसून विजयी सभा आहे, गुलाबभाऊंनी पाच वर्षे जनतेची सेवा केली असून त्याना प्रचंड मताधिक्यानी निवडून आण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एम. पाटील सर यांनी केले. आभार विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी मानले. याप्रसंगी शिवसेना, भाजपा व अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी -शे कडो गावातून हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यकर्ते, या रॅलीत महिलांची उपस्थिती देखील लक्षनिय होती . रॅलीत उपस्थित नागरिकांसाठी ठिक – ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!