
जळगाव :- महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचाराचा धुराळा हा जोरदार सुरू आहे. त्यानुसार मतदारसंघातील कासोदा व एरंडोल येथे प्रचाराला व प्रचार कार्यालयाचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे.
जळगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पवार यांच्या कासोदा येथील कार्यालय व प्रचाराचा शुभारंभ माजी पालकमंत्री डॉ. सतिश अण्णा पाटील व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख मा. डॉ. हर्षलदादा माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.
ग्रामीण भागात शिवसेनेचा जोरदार प्रचार
महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार करण पवार यांचा ग्रामीण भागात जोरदार प्रचाराला प्रारंभ झालेला आहे. ग्रामीण भागात सभा बैठका तसेच नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी मतदारांना करत आहे.

