बातम्या

लोकांमध्ये दहशत मांजवणाऱ्या अस्मा लां शनिपेठ पोलिसांनी केले अटक

दि. २९/०८/२०२४ रोजी दुपारी १५.३० वाजेचे सुमारास पोउपनि चंद्रकांत धनके यांना माहिती मिळाली की, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काऊ कोल्हे शाळेच्या मागील बाजुस जुना खेडी रोड जळगाव भागात एक इसम त्याच्या हातात पिस्तोल घेवुन लोकांमध्ये दहशत माजवित आहे. अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोउपनि धनके यांनी सदची माहिती पोनि अनिल भवारी, अतिरीक्त कार्यभार शनिपेठ पोस्टे सो यांना देवुन त्याचे आदेशाने पोउपनि मुबारक तडवी तसेच गुन्हे शोध पथकातील पोना. किरण वानखेडे, पो.हे.कॉ. विजय खैरे, पोकॉ. विक्की ईंगळे, योगेश साबळे, मुकुंद गंगावणे असे पथक तयार करुन दहशत माजविणा-या इसमास पकडुन कारवाई करा असे आदेशित केल्याने सदर पथक स्वप्नशिल अपार्टमेंट जवळ काउ कोल्हे शाळेच्या मागील बाजुल जुना खेडी रोड भागात दाखल होताच दहशत माजविणारा इसम पोलीसांना पाहुन पळु लागल्याने त्या इसमास पोलीसांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस असलेली गावठी बनावटीची पिस्तोल जप्त केली आहे. दहशत माजविणा-या इसमाचे नाव गाव बाबत विचारपुस करुन सदर ईसम हा अल्पवयीन (विधी संघर्ष ग्रस्त बालक) असुन त्याचे विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.हे.कॉ. विजय खैरे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!