बातम्या

गरिबीतून स्वप्नांची उभारणी – जळगावच्या रोहित नाफडे यांचा ‘द स्ट्रीट कॅफे’!”

चविष्ट स्ट्रीट फूडसोबत संघर्षाची चवही अनुभवा – आजच भेट द्या!

जळगावकरांसाठी एक प्रेरणादायक आणि चविष्ट बातमी! गरिबीतूनही स्वप्नं मोठी ठेवणाऱ्या आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या रोहित नाफडे या तरुणाने जळगाव शहरात आपल्या मेहनतीच्या जोरावर एक छोटं पण चवदार स्वप्न उभं केलं आहे – “द स्ट्रीट कॅफे”.

हे कॅफे दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, जळगाव – 425001 येथे सुरू करण्यात आले आहे आणि विशेष म्हणजे, यामागे कोणतीही मोठी गुंतवणूक नाही, नाही कुठलीही मोठी साथ… आहे फक्त मेहनतीची जिद्द, चवदार कल्पना आणि जगण्याची तळमळ!

 

रोहितचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्याने हार मानली नाही. शिक्षणासोबत छोट्या-मोठ्या कामांमधून अनुभव घेत घेत त्याने ‘स्वतःचं काहीतरी सुरू करायचं’ हे स्वप्न उराशी बाळगलं. आणि अखेर ते स्वप्न साकार करण्यासाठी उभा केला – “द स्ट्रीट कॅफे”.

रोहितचं आयुष्य फक्त एका कॅफेसारखं सोपं नाही – तो सकाळी ७ वाजता एका कंपनीत कामाला जातो आणि दुपारी ४ वाजता परततो, आणि थोडीशी विश्रांती घेऊन लगेचच त्याची फूड गाडी सुरू करतो. थकवा, गरिबी, अडचणी यांना मागे टाकत तो दिवसभराच्या कामानंतरही हसतमुखाने ग्राहकांना चवदार पदार्थ देतो.

 

या कॅफेमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची विविधता आणि चव ही कुठल्याही मोठ्या ब्रँडला टक्कर देणारी आहे.

  • स्टिम डिशेस: स्टीम व्हेज, स्टीम पनीर (हाफ आणि फुल)
  • फ्राय डिशेस: फ्राय व्हेज, फ्राय पनीर (हाफ आणि फुल)
  • मॅगी स्पेशल: प्लेन, मसाला, पिरी पिरी, चीज मॅगी आणि भन्नाट मॅगी घोटाळा
  • फ्राईजच्या व्हरायटीज: सॉल्टेड, मसाला, पिरी पिरी फ्राईज – चीजसह ही मिळतात
  • भेळप्रेमींसाठी: स्पेशल कुरकुरे, भेळ आणि चीज कुरकुरे भेळ
  • स्वच्छता, चव आणि प्रेम यांचं एकत्रित मिश्रण म्हणजेच द स्ट्रीट कॅफे.

“माझा उद्देश केवळ व्यवसाय नाही, तर प्रत्येकाला कमी किमतीत भरपूर चव देणं आणि माझ्या पायांवर उभं राहणं हाच आहे,” असं रोहित आवर्जून सांगतो.

“माझ्या गाडीवर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने फक्त खवय्याच नव्हे, तर माझ्या प्रवासाचा भाग व्हावं अशीच इच्छा आहे,” असं रोहित भावनिकपणे सांगतो.

तो केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी आणि स्वप्नांसाठी लढतोय. त्याची ही मेहनत पाहून जळगावकरांनी एकदा तरी त्याच्या ‘द स्ट्रीट कॅफे’ ला भेट द्यावी, आणि त्याच्या संघर्षात सहभागी व्हावं.

चव अशी की, मनात आणि जिभेवर कायमची घर करेल… आणि मेहनत अशी की, मन जिंकेल!

जळगावकरांनी एकदा या ठिकाणी जाऊन चव घेऊन, त्याच्या मेहनतीचं चीज करून दाखवावं. हा केवळ कॅफे नाही, तर एका स्वप्नाचा खमका स्वाद आहे!

– ‘द स्ट्रीट कॅफे’, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, जळगाव

संपर्क —8390361053,7972606091

आजच भेट द्या आणि त्याच्या प्रवासाचा भाग व्हा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!